Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव महानगर लाडशाखीय वाणी समाजाकडून माहेरवाशिण कार्यक्रम संपन्न..

दि . 31/10/2019

दिवाळी म्हटलं की बहिणी माहेरी येतात. आणि भाऊबीज साजरी करतात याचेच औचित्य साधून मालेगाव महानगर लाड शाखीय वाणी समाजाने शहरातील नऊशे माहेरवाशिणीना एकत्र आणले. आणि मालेगावातील बालाजी लाँन्स येथे एक आगळावेगळा सोहळा उत्साहात संपन्न झाला. 
   भाऊबीजच्या निमित्ताने  साधारण 900 बहिणी मालेगावात हा सण साजरा करण्यासाठी एकत्र आल्यात आणि ८० वर्षांच्या आजीपासून 20 वर्षाच्या तरूण अशा सर्व माहेरवाशिणीनी यात सहभाग घेतला. 
   कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. 
प्रास्ताविक प्रा. डाँ. उषाश्री बागडे यांनी केले. व्यक्तिमत्व विकासावर प्रा. रसाळ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. 
 यावेळी माहेरवाशिणींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत.याप्रसंगी कष्टकरी 
आयांचा  सन्मान करण्यात आला. 
  कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 
मनोरंजनात्मक खेळांचे तसेच लकी ड्राँ चे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये 800 महिलांनी सहभाग घेतला आणि यातून 16 महिलां मध्ये फायनल राऊंड झाला. विजेत्या सर्व  16 महिलांना बक्षिस म्हणून साड्या देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते, व महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत.


ताज्या बातम्या