Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
“अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावेत” -ना.दादाजी भुसे.

दि . 27/10/2019

मालेगांव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बाजरी, ज्वारी, मका पिकांच्या कणसांना कोम फुटत आहेत. तसेच फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संदर्भात ना. दादाजी भुसे यांनी प्रांताधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना केल्या.

पावसामुळे काहि ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे. काही ठिकाणी पांदन रस्त्यांचे तसेच मोऱ्यांचेही नुकसान झालेले आहेत. सततच्या पावसामुळे तालुक्यासह शहर परिसर संपुर्ण जलमय झालेला आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असुन डेंगु व मलेरीया  रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

ना. दादाजी भुसे यांनी सदर नुकसान ग्रसत्‍ भागात संबंधित ग्रामसेवक, तलाठी व कृषीसहाय्यक यांना त्वरीत पंचनामे करण्याच्या सुचना केल्या. तसेच रोगराई आटोक्यात आनण्यासाठी महापालिका प्रशासनास शहर तसेच ग्रामिण भागातही फवारणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या.

यावेळी कृ.उ.बा.सभापती-श्री.राजेंद्र जाधव, उपसभापती-श्री.सुनिल देवरे, माजी पं.स.सभापती-श्री.धर्मराज आण्णा पवार, सं.गां.निराधार योजना अध्यक्ष-श्री.प्रमोद पाटील, श्री.केशवनाना पवार, श्री.दौलत बागुल, श्री.विश्वनाथ निकम, श्री.कृष्णा ठाकरे, श्री.चेतन पवार, श्री.भगवान शिंदे, संबंधित अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


ताज्या बातम्या