Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
साने गुरुजी आरोग्य मंदिर येथे मोफत रक्तमोक्षण शिबीर संपन्न..

दि . 27/10/2019

मालेगांव(प्रतिनिधी):- सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीही धन्वंतरि जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आयुर्वेदाचार्य पी.टी. जोशी यांच्या शुभार्शिवादाने साने गुरुजी आरोग्य मंदिर येथे मोफत रक्तमोक्षण शिबीराचे आयोजण करण्यात आले होते. प्रारंभी संस्थेचे प्रबंधक जयेश शेलार यांनी कार्यक्रम आयोजना मागची भुमिका स्पष्ट करून संस्थेने वर्षभरात आयोजित केलेल्या प्रत्येक शिबीरास जनतेने जो प्रतिसाद दिला या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे विश्वस्त अॅड.भास्कर तिवारी व सामाजिक कार्यकर्ते द्वारकादासजी तापडीया  यांच्या हस्ते साने गुरुजींच्या पुतळयास सुतहार अर्पण करण्यात आला तर वैद्य शिवानंद तोंडेच्या हस्ते धन्वंतरिच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख वैद्यकीय अधिकारी प्रांजल आढाव यांनी व देशाच्या विविध भागातून आलेल्या वैद्यांनी सुमधुर आवाजात 'धन्वंतरि स्तवनाचे' पठण केले तर उपस्थित नागरिकांसह रूग्णालयाच्या कर्मचारींनी "खरा तो एकची धर्म" हि प्रार्थना म्हंटली. त्यानंतर रितसर 'रक्तमोक्षण शिबीरास' प्रारंभ झाला. या मानवतावादी अभियानात वैद्य. शिवानंद तोंडे, वैद्य. योगेश जोशी, वैद्य. पुनम तागड, वैद्य. विजया सोनवणे, वैद्य. अनामिका शर्मा, वैद्य. आशिष हिरे, वैद्य. बालदेव सिंग, वैद्य. प्राची देशवांडीकर, वैद्य. विशाल गोमे, वैद्य. सरस्वती जाधव, वैद्य. स्नेहा निकम, वैद्य. हुमेरा शेख, आबा गायकवाड, प्रविण गायकवाड यांनी रक्तमोक्षणाची जबाबदारी पार पाडली तर सहकारी म्हणून निर्मला गायकवाड, मुस्तफा मन्सूरी, कुणाल लाडके, पुनम खांडेकर, सुवर्णा निकम, शरवरी बागडे, वैष्णवी तंटक,  रितेश बागुल, संदिप महाजन, प्राजक्ता इंगळे, दिपाली जगतात, वाल्मिक खांडेकर, अनिल चंडालिया यांनी जबाबदारीने काम केले. 

        चाळीसगांव येथील व्यापारी मुख्तार भिकन शेख यांनी दिपावली निमित्त सर्व उपस्थितांसाठी रक्तमोक्षण पुर्वी मिष्टान्न ग्रहनासाठी पेढ्यांची भेट देत सर्वधर्म समभावाची प्रचीती दिली. त्यांच्या या दानशुरते बद्दल प्रबंधक जयेश शेलार यांनी लोकसमिती व साने गुरुजी आरोग्य मंदिर तर्फे आभार व्यक्त केले. शिबीर कालावधीत लोकसमिती अध्यक्षा माई पाटील,  प्रदीप कापडीया, रमेश शर्मा, डाॅ.बिपीन पारेख, विलास वडगे, सुनील वडगे, विकास मंडळ, अशोक फराटे या सर्व मान्यवरांनी शिबिरास भेट दिली व अशा लोकोपयोगी उपक्रमांच्या आयोजनांसाठी सदैव मदत,मार्गदर्शन व वेळ देण्याचे आश्वासन देत शिबीर व्यवस्थापना बद्दल रूग्णालयाच्या संपूर्ण सेवक वर्गाची प्रशंसा केली.

         शिबीर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य करणार्या वैद्यांचा श्रीमती माई पाटील यांच्या हस्ते भेट वस्तू देवून  सत्कार करण्यात आला

शिबीराच्या यशस्वीतेसाठी हरिष पाठक, शिवाजी साळुंखे, मुकुंद शिरोडे, किरण सोनवणे, सारंग पाठक, अतुल मोरे, सनी काळे, राहुल आगारकर, प्रमोद तंटक, हरिष पाटील, पुरुषोत्तम दुसाने, कल्पना शहा, प्रतिभा सोनवणे, कल्याणी शेलार, संगीता महाजन यांनी परिश्रम घेतलेत. तर सर्व संस्थेचे प्रबंधक जयेश शेलार यांनी उपस्थित सर्व वैद्य, मान्यवर,  सहकारी, मदतनीस व नागरिकांचे आभार व्यक्त केले.


ताज्या बातम्या