Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
‘बाप बापचं असतो’! पवारांचा बॅनर लावून राष्ट्रवादीने भाजपाला डिवचलं

दि . 27/10/2019

कोल्हापुरात मागील वेळी सहा ठिकाणी भगवा फडकावणाऱ्या शिवसेनेला यंदा केवळ राधानगरीत प्रकाश आबीटकरांच्या रूपाने एकमेव गड राखता आला. आघाडीच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी-काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसंडी मारली. आघाडीच्या या दमदार विजयानंतर कोल्हापूरमध्ये ” बाप बापचं असतो ” असे पोस्टर झळकले आहेत.

कोल्हापूर शहरात एसटी स्टँड परिसरात हे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. त्यावर ” बाप बापचं असतो ” असे कॅप्शनही देण्यात आले आहे. एकप्रकारे भाजपा-शिवसेनेला झोंबणारी टीकाच आहे. राष्ट्रवादी युवर व विद्यार्थी काँग्रेस संघटनेने हे बॅनर लावले आहेत. सध्या कोल्हापूरमध्ये या बॅनर्ची चांगलीच चर्चा रंगली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल होत आहेत.

खरंतर कोल्हापूरमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष असेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील जागा जिंकली पण स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. कोल्हापुरात काँग्रेस मुक्तीचा ध्यास घेतलेल्या भाजपला भोपळा फोडता आला नाही. काँग्रेसने आश्चर्यकारकरीत्या चार जागांवर विजय मिळवत ‘सतेज’ झाली आहे. काँग्रेसच्या या यशाला ‘आमचं ठरलंय’ची भगवी परतफेड फायदेशीर ठरली. राष्ट्रवादीने हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांच्या रुपाने आपल्या दोन जागा कायम राखल्या आहेत. दरम्यान लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही ‘स्वाभिमानी’ला या निवडणुकीत सपशेल अपयश आले आहे.

(Loksatta)

 


ताज्या बातम्या