Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आदित्य ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत झळकले बॅनर...

दि . 25/10/2019

विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. वरळी विधानसभा मतदारसंघतून आदित्य ठाकरेंना ८९,२४८ मते मिळाली. तर त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांना २१,८२१ आणि बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांना ७८१ मतं मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला जोर आला असतानाच, आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या मतदारसंघात झळकले आहेत. विशेष म्हणजे आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. ‘शिवसेनेचे युवा नेते आणि भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल अभिनंदन’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळं आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे आदित्य ठाकरे शपथ घेतील का, अशी उत्सुकता लागली आहे.


ताज्या बातम्या