Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
परतीच्या पावसाने शेतकरी संकटात कसमादे परिसरात पिकांचे मोठे नुकसान...

दि . 23/10/2019

मालेगावात काल सायंकाळी पासून पाऊसाची संततधार सुरू आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.काही काळ पावसाने विश्रांती दिल्याने मका,बाजरी व कडधान्य काढून पडले होते.परंतु,पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतातील पिकांची मोठी हानी होते आहे.शेतकऱ्यांना आधीच बोण्डअळीने हैराण करून ठेवले होते कसेबसे पिकं काडणीवर आले आणि आता पावसात भिजल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

द्राक्षे बागकरता घरातल्या बायांच आंगवरचं सोनं गहाण ठेवलेय,नातेवाईकडून उसने पैसे घेतले.पण,पाऊसानी वाटोळं केले..! अशी केविलवाणी आहे ती नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील परिसरातील द्राक्षे उत्पादक शेतक-यांची तयार झाली आहे. द्राक्षे मन्यांना तडे, भुरी रोगामुळे धास्तावले आहेत. मक्यावरील लष्करी आळीमुळे आधीच बळीराजा चिंतेत असताना आता द्राक्षे मन्यांना तडे जात असल्याने शेतक-यांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून नेतोय का अशी चिंता व्यक्त केली जात आहे.   

परतीच्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी धास्तावले असून द्राक्षे बागेसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात जाणार असल्याची भिती द्राक्षे उत्पादकांना सतावत आहे. अनेक ठिकाणी द्राक्षे बागेतील मन्यांना तडे व भुरी रोगाने ग्रासले आहे. द्राक्षे शेवटच्या टप्प्यात असतांनाच सतत बदलत असलेले हवामान व परतीच्या पावसामुळे तालुक्यात द्राक्षे उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांची झळ बसणार असल्याचे चित्र आहे. द्राक्ष बागायतदार शेतक-यांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रुपये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकरीचे झाले आहे.

पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन द्राक्षे बाग उभी

बहुतांश द्राक्षे उत्पादकांनी बॅक, फायनान्स, सोनं गहाण ठेऊन व हातउसनवार करीत द्राक्षे बागेवर खर्च केला आहे. वायगाव येथील शरद देवरे या द्राक्षे उत्पादक शेतक-याने पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन द्राक्षे बाग उभी केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे त्यांचे स्वप्न धुळीत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गहाण ठेवलेले सोनं सोडावे तरी कसे या विवेचनात ते सापडले आहेत. द्राक्षे झाडांवरील मन्यांना तडे गेल्याने व्यापारी फुकटही घेत नाहीत. पुन्हा द्राक्षे मनी तोडण्यासाठी पन्नास ते साठ हजारांचा खर्च करावा लागणार असल्याचे शेतकरी देवरे यांनी सांगितले.


ताज्या बातम्या