Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
व्हॉट्सअप अन दिवाळी..!

दि . 23/10/2019

काय ती दिवाळी होती. दिवाळीचे दिवस जवळ आले की, शाळेच्या सुट्टीची वाट बघायचो शेवटचा पेपर संपला की कधी एकदा उड्या मारत घरी जातो आणि गेल्यावर आईला सुट्टीची बातमी सांगतो असे व्हायचे, पण आता घरी जाण्या आधीच आईला व्हॉट्स अप वर सुट्टी संदेश आलेला असतो. आधी दिवाळीची खरेदी करायला सगळे सोबत जायचे चार दुकान फिरायचे,आवडीचे कपडे घ्यायची आणि आनंदात घरी यायचे. पण आता ऑनलाईन शॉपिंग आप त्याच्यावर कपड्यांची साईज कलर निवडा आणि घरी कपडे मागवा. आधी नातेवाईक भेटायला येतील म्हणून घराची साफसफाई केली जायची. सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, एकमेकांना शुभेच्छा दिल्या जायच्या, फराळाची देवाणघेवाण व्हायचे, पण आता साफसफाई होते ते मोबाईल मधील संदेशाची का तर दिवाळीचे संदेश येतील, व्हॉट्स अप  वरून फराळाचे फोटो पाठवले जातात. पूर्वी मुलांमध्ये कधी एकदा मामाच्या गावाला
जावून धम्माल करू याच्यासाठी उत्साह असायचा, पण
दगडावर टिकल्या फोडणारे हीच मुले आता मोबाईल धरून बसलेली दिसतात. आता दिवाळीला सर्व एकत्र जरी आले तरी ते गप्पांमध्ये नाही तर मोबाईल मध्ये व्यस्त असतात. किती व्यापून टाकले या मोबाईल ने आपले जीवन, किती एकाकी केले याने आपले जीवन. ज्या मानवाने जग जवळ आणण्यासाठी मोबाईल बनवला, तोच मोबाईल आता मावाला दूर करतोय. ज्या मानवाने हे वेगवेगळे अँप बनवले त्याच्यातच तो गुरफटून चाललाय. सण, उत्सव याच्यासाठी एकत्र येण दुर्मिळ होत चाललंय. विचार करा, तुम्हीच ठरवा मोबाईल साठी जगायचे की जगण्यासाठी मोबाईल वापरायचे.
     -  *ज्योती प्रतिष भुसे,मालेगाव*


ताज्या बातम्या