Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बघा जिल्ह्यातील प्रमुख लढती..

दि . 08/10/2019


मालेगाव बाह्य    : ९ उमेदवार. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्यातच लढत.
मालेगाव मध्य     : १३ उमेदवार. कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख, एमआयएमचे मुफ्ती मोहंमद इस्माईल आणि भाजपचे दिपाली वारुळे यांच्यात लढत.
कळवण              : ६ उमेदवार. माकपचे जे.पी. गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार आणि शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात लढत.

बागलाण             : ६ उमेदवार. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण आणि भाजपचे दिलीप बोरसे यांच्यात लढत. अपक्ष गितांजली पवार यांची माघार.

चांदवड                : ९ उमेदवार. आमदार डॉ. राहुल आहेर आणि कॉंग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांच्यात लढत.

नाशिक पूर्व          : मनसेचे माजी महापाैर अशोक मुर्तडक यांची माघार. १२ उमेदवार रिंगणात. मनसेतून भाजपत दाखल अॅड. राहुल ढिकले आणि भाजपने तिकीट कापल्याने राष्ट्रवादीकडून लढत असलेले आमदार बाळासाहेब सानप यांच्यात दुरंगी लढत.
नाशिक मध्य      : १० उमेदवार. भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, वंचितचे संजय साबळे आणि काॅंग्रेसच्या हेमलता पाटील यांच्यातच चाैरंगी लढत.
नाशिक पश्चिम   : १९ रिंगणात. भाजपच्या अामदार सीमा हिरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे, मनसेचे दिलीप दातीर, माकपचे डाॅ. डी. एल. कराड आणि शिवसेनेचे बंडखोर अपक्ष विलास शिंदे यांच्यात लढत. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे यांची माघार.

देवळाली             : १२ उमेदवार. शिवसेनेचे योगेश घोलप, राष्ट्रवादीच्या सरोज अाहिरे, वंचितचे गौतम वाघ आणि मनसेचे सिध्दांत मंडाले यांच्यात लढत.
नांदगाव             : १५ उमेवार. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्यातच लढत. माजी आमदार अपक्ष संजय पवार, अपक्ष मनीषा पवार यांची माघार.
येवला                : ८ उमेदवार. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात लढत. अपक्ष माणिकराव शिंदे यांची माघार.
सिन्नर               : ९ उमेदवार. शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्यात लढत.

निफाड : ६ उमेदवार. शिवसेनेचे अनिल कदम, राष्ट्रवादीचे दिलीप बनकर, ,अपक्ष यतिन कदम यांच्यात लढत.

दिंडोरी : ५ उमेदवार. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्यात सरळ लढत आहे. माजी आमदार अपक्ष धनराज महाले, रामदास चारोस्कर यांची माघार.
इगतपुरी : ९ उमेदवार. शिवसेनेच्या निर्मला गावित आणि कॉंग्रेसचे हिरामण खोसकर यांच्यात लढत.


ताज्या बातम्या