Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या गाडीवर तालुका पोलिसांची कारवाह..

दि . 05/10/2019

मालेगाव अपर पोलीस अधीक्षक आदेशानुसार नाकाबंदी करीत असतांना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव फाट्यावर आज पहाटे अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या गाडीचा संशय आल्यावर पोलीस शिपाई सुभाष चोपडा यांना संशय आल्यावर इंडिका व्हिस्टा गाडी थांबवून दोन इसमांना गाडीमधील दोन इसम धुळे हून नाशिक कडे जात असतांना मालेगाव रोड वरील चाळीसगाव फाट्यावर मोठ्या शिताफीने गाडी तपासणी केली असता अफूची बोड एकूण-५६ किलो ताब्यात घेण्यात आले आहेत.परंतु गाडीची तपासणी करीत असतांनाच गाडीत असलेले रतलाम येथील दोघेही यावेळी फरार झाले असून यावेळी वाहन क्र.MP 09-CN 6313 गाडीत फिकट रंगाच्या बँग मध्ये अफु नावाचे अमली पदार्थ वाहतूक व  विक्रीसाठी मालेगाव शहराकडे येत असल्याचा संशय आहे. फरार दोन्ही ईसम मुळचे मध्यप्रदेश मधील रतलाम येथील राहत असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिली.
अफू अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी तालुक पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी पंचनामा केला आहे.एकूण मुद्देमाल  ५९५२८० ताब्यात घेण्यात आला आहे.


ताज्या बातम्या