Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मध्यतुन काँग्रेसचे असिफ शेख तर एमआयएम तर्फे मुफ्ती इस्माईल यांचा उमेदवारी अर्ज दाखल...

दि . 03/10/2019

मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्र 114 मधून विद्यमान आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस तर्फे अधिकृत तर MIM तर्फे मुफ्ती इस्माईल यांनी उमेदवारी अर्ज दाखल.

 हजारोंच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल  केलामालेगाव मध्य 114 विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यानंतर, माजी आमदार आणि आताचे मनपा महापौर काँग्रेस चे दोनदा आमदार म्हणून शेख रशीद असिफ शेख म्हणून आले होते त्या नंतर युवा नेतृत्व म्हणून असिफ शेख यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला आहे, विधानसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार असिफ शेख यांना काँग्रेस चे अधिकृत उमेदवारी मिळाली आहे मोठ शक्तिप्रदर्शन करून,  निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा  यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

विद्यमान आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात कट्टर विरोधक असलेले माजी आमदार मुफ्ती मोहमद इस्माईल यांनी mim च्या अधिकृत तिकिटावर यावेळी बैलगाडीवर येत विकासाची बोंबाबोंब दाखवत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज निवडणुकीचा अर्ज भरण्यात आला.आमदार आसिफ शेख यांच्या समोर इस्माईल यांचे तगडे आव्हान ठाकले आहे.या लढतीमुळे मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात सर्वात मोठी चुरस यावेळेस निर्माण झाली आहे.यामुळे या लढतीकडे  सर्वचे लक्ष लागून राहणार आहे.


ताज्या बातम्या