Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाह्य मतदारसंघात यावेळी पुन्हा भुसे विरुद्ध हिरे -सूत्र..

दि . 22/09/2019

मालेगांव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी भुसे विरुद्ध हिरे अशी लढत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.या बाबतीत अद्वय हिरे यांच्या कार्यालयातुन पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.जर मालेगाव बाह्य साठी राष्ट्रवादी व काँग्रेस तर्फे अद्वय हिरे यांची निश्चिती झाली तर पुन्हा या मतदारसंघात हिरे विरोधात भुसे अशी लढत असणार आहे.राज्यमंत्री भुसे यांच्या पहिल्या लढतीपासून हिरे हे विरोधात असल्याने भुसे यांचा विजय झाला आहे.

मालेगांव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती पत्रकाद्वारे अद्वय हिरे-पाटील यांच्या कार्यालयामार्फत माहिती दिली आहे.

  मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाले यावेळी डॉ. अद्वय आबा हिरे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषारदादा शेवाळे प्रसादबापू हिरे, राजेंद्रभैया भोसले डाॅ. जयंत पवार आदी कोअर कमिटी सदस्य बैठकीस उपस्थित होते या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येवुन उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात अली आहे.राष्ट्रवादीतर्फे उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करतील अशी माहितीही या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

   काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी एक दिलाने काम करणार असल्याने मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात परिवर्तन निश्चित असल्याचे सर्वसामान्य नागरीकांत चर्चिले जात आहे...


ताज्या बातम्या