Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
महाराष्ट्र आणि हरियाणात आजपासून आचारसंहिता लागू

दि . 21/09/2019

विधानसभा निवडणूक जाहीर : महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी..

राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्च्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. थोड्याच वेळात निवडणूक आयोग तारखांची घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात 1.8 लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.


ताज्या बातम्या