Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावी आढळले डेंग्यूचे ३४ रुग्ण; राज्यमंत्री भुसे यांनी आरोग्याची चिंता व्यक्त करीत घेतलेल्या मनपा आणि आरोग्य विभागाच्या बैठकीनंतर उपाययोजना शून्य..

दि . 21/09/2019

मालेगाव शहरात डेंग्यूसदृश्य संख्येत वाढ हाेत आहे. दाेन आठवड्यात ३४ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील १८ रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दाेन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.तर डेंग्यू सदृश्य रुग्णांनी  खाजगी रुग्णालये हाऊस फुल भरली आहेत.या बाबतीत मालेगाव शहरातील आरोग्य यंत्रणा कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधक यंत्रणा रंभावितांना दिसून येत नाही.मनपा आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाचे ताळमेळ नसल्याने डेंग्यू वाढत असल्याचे दिसून येत आहे. 
शहरातील आराेग्याविषयी चिंता व्यक्त करत राज्यमंत्री दादा भुसे यांनी महापालिका व आराेग्य विभागाची बैठक घेतली हाेती. अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. बैठकीत १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती देण्यात आली हाेती. अवघ्या दाेन दिवसात हा आकडा दुपटीने वाढला आहे. तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे.


ताज्या बातम्या