Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भावडे प्राथमिक शाळेतुन गॅस सिलेडरची चोरी..

दि . 20/09/2019

देवळा तालुक्यातील भावडे येथिल जिल्हा परिषद शाळेतुन रात्री अंधाराचा व पावसाचा फायदा घेवुन चोरट्यानी कुलुप तोडून दोन गॅस सिलेडर चोरून नेले मागील वर्षात चोरिची ही दुसरी घटणा आहे . मागील वर्षात ऑगष्ट महिण्यात कुलुपे तोडुन शाळेतुन एक एल . ई .डी ' , संच पोर्टबल साउंड सिष्टम चोरून नेला होता .पोलीसांनी सदर घटणेचा पंचनामा करून औपचारिकता पुर्ण केली खरी पन त्यांना त्या चोरिचा छडा लावण्यास आपयश आल्यानेच  चोरट्यांनी  पुन्हा एकदा लक्ष करून गॅस सिलेंडर चोरुन नेले . असे स्थानिक ग्रामस्थांचे मत आहे .भावडे जिल्हा परिषद शाळा ही विंचुर=प्रकाशा राज्यमहामार्गावर देवळा शहरापासुन ७ किलोमिटर रस्थाच्या कडेला आहे . शाळेत विजेची सोय नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी सलग दुसर्यादां चोरिचा यशस्वी प्रयत्न केला . त्यामुळे शाळेत विद्युत ची सोय करावी अशी मागणी पालकांनी केली 
सदर घटणेचा पचंनामा सहायक पोलीस उपनिरिक्षक एल .के. धोक्रट  यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धोक्रट व गायकवाड करत आहे आहेत याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी विजया फलके व केंद्रप्रमुख संजय ब्रम्हकार यांनी शाळेत येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नमूद केले.


ताज्या बातम्या