Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कर्म. या ना जाधव शाळेची क्षितिजा स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत व्दितिय; स्पर्धेत हॅट्रिक करणारी पहिलीच स्पर्धक

दि . 18/09/2019

मालेगाव- येथील कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयातील इ. ५ वीतील विद्यार्थ्यीनी क्षितिजा रविराज सोनार हिने ५ वी ते  ७ वी  या वयोगटात स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत  व्दितीय ‌क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले असून जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे. तिने झाड या शीर्षकाची, निसर्गाची जोपासना करण्याचा संदेश देणारी कविता सादर केली. या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी बक्षिस‌ घेत तिने हॅट्रीक साधत तिने अनोखा विक्रम केला आहे. आता‌ तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
नाशिक येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था व महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर कवी कै. आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापुजी ठोंबरे स्मरणार्थ बालकवी स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून या स्पर्धेंतर्गंत क्षितिजाने यावर्षी स्वरचित कवितेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. यापुर्वी तिने अन्यरचित काव्यवाचन स्पर्धेत सलग दोन वेळा दुसरे व पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवले आहे. असा विक्रम साधणारी ती जिल्ह्यातील पहिली स्पर्धक ठरली आहे. कवी राजेंद्र दिघे, गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे, म. स. गा. महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश शिरुडे, के.बी.एचचे प्राचार्य .... पवार यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.
नाट्य अभिनय, कथकनृत्य, शिल्प व चित्रकला क्षेत्राशिवाय शैक्षणिक क्षेत्रातही तिने खुप कमी वयात अनेक ठिकाणी यश प्राप्त केले आहे. 
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनिल वडगे, प्राचार्य एच. एस. वाघ, प्राथमिकचे मुख्याध्यापक विकास मंडळ, एस. जे. अहिरे, सौ. मंगला देवरे, ग्रंथपाल स्वाती अहिरे यांनी अभिनंदन केले आहे. शब्दगंध प्रतिष्ठानचे संस्थापक व पत्रकार रविराज सोनार यांची ती कन्या आहे. 
तिच्या या यशाबद्दल ज्ञानवर्धिनीचे सचिव गोपाळ पाटील, उपाध्यक्ष अॅड अंजली उगावकर, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, युवानेते अद्वय हिरे, संपदा हिरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


ताज्या बातम्या