Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
दहिवड ग्रामस्थांचे लेखी आश्वासनानंतर अमरण उपोषण मागे..

दि . 18/09/2019


मेशी वार्ताहर :देवळा तालुक्यातील दहीवड गावात व परिसरात सिंगल फेज वीज पुरवठा नियमित करण्यासाठी दहिवड ग्रामस्थांच्या वतीने येथील वीज उपकेंद्र केंद्रा समोर आमरण उपोषण करण्यात आले दुपारी कार्यकारी अभियंता टेंभुर्णे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले दहीवड गावात व परिसरात येथिल ३३ / ११ केव्हि शमता असलेल्या उपकेंद्र द्वारे वीजपुरवठा करण्यात येतो जवळपास शंभराच्या आसपास रोहित्र आहेत यापैकी काही रोहित्र नादुरुस्त झालेले आहेत तर काही ठिकाणी सिंगल फेज रोहित्रच नाहीत त्यामुळे परिसरातील काही भागात रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थांना विजेअभावी रात्र काढावी लागते यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींना सामना करावा लागत आहे महावितरण मात्र या समस्येचे निवारण करण्याची तसदी घेत  नसल्याने  ग्रामस्थांत संतापाची लाट उसळलेली आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे  गृहिणी अनियमित वीजपुरवठा मुळे त्रस्त झाले आहेत गावातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे मागणीही केली परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही विज वितरण अधिकार्‍याकडून केवळ सिंगल फेज वीजपुरवठ्याची काम चालू असून ते लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल असे पोकळ आश्वासन देण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळे दहिवड येथील ग्रामस्थांनी सरपंच आदिनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दहिवड येथील ३३ / ११ केव्ही वीज उपकेंद्र समोर आमरण उपोषण केले यावेळी उपसरपंच मनीष ब्राह्मणकार .प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा जाधव . तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश देवरे . प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय देवरे . शहराध्यक्ष बापू देवरे . आदी सह ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला काल दुपारी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता टेंभुरणे यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन तात्काळ सिंगलफेज योजना कार्यान्वित करण्यात येईल  असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


ताज्या बातम्या