Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात बुधवारी भाजपची रॅली

दि . 17/09/2019

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी  नाशकात येत असलेली महा जनादेश यात्रा व पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जाहीर सभेच्या प्रचारार्थ बुधवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत व प्रत्यक्ष नाशकातील जाहिर सभेला हजाराे कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी केले.
गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत एकता जिमखाना येथे काल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या प्रसंगी गायकवाड यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या नाशिक दाैऱ्याची माहितीदेण्यात आली. नाशिकच्या सभेला शहरातून हजाराेंच्या संख्येने सहभागी हाेण्यासाठी सर्व तरुणांना बराेबर घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जगदीश गोऱ्हे, जयप्रकाश पठाडे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस नगरसेवक मदन गायकवाड, संजय काळे, भरत बागूल, विजय भावसार, सोमा आण्णा गवळी, महेश वाघ, आनंद गवळी, राजेंद्र शेलार, दिनेश साबणे, सर्जेराव पवार, दीपक गायकवाड, निसार शेख, विजय इप्पर, किशोर गुप्ता, सुनील भुसे, राकेश शिंदे, बंडू सावंत, जगदीश सूर्यवंशी, बाळासाहेब कांबळे, युवा गिते, किरण सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.


ताज्या बातम्या