Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
किनो नावाप्रमाणेच समृद्ध - सिंधुताई सपकाळ

दि . 17/09/2019

किनो शिक्षा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मालेगाव : आपलं राहणीमानच आपला दर्जा आणि देशाचं प्रतिनिधित्व कथन करत असते. आपली संस्कृती झाकल्या पदराची आहे याचं भान ठेवण्याची नितांत गरज आहे. अनंत अडचणींवर मात केलेल्या कामावरच समाज पसंतीची मोहोर उमटवत असते. काट्यांचं अस्तित्व मान्य करून फुलात सुगंध पेरण्याचं निर्मळ काम सर्वांनी करायला हवं.. किनो संस्थेने आपल्या नावाप्रमाणेच मनाची समृद्धी दाखवत गुणी-शिक्षकांना व शाळांना शोधून गौरवत आहे. उत्तरदायित्व म्हणजे काय याचा हा वस्तुपाठ ठरावा असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्त्या व अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ यांनी येथे काढले. 
येथील किनो एज्युकेशन संस्थेच्या वतीने माळी समाज मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या किनो शिक्षा गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार किशोर दराडे होते. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, किनो एजुकेशन सोसायटीचे सचिव रईस शेख, उपाध्यक्ष सोहेल कुरेशी, संचालक मतींन कुरेशी, नितीन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बिभत्स राहणीमानच आपले संस्कार सांगण्यास पुरेसे असतात. महिलांनी पेहरावात आईपण जपावं. मादीऐवजी मातापणाचे मिरवणे हे संस्कृतीरक्षकतेचे लक्षण आहे. शिक्षकांना ज्ञानानर्जनातून देश घडवण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सर्वांनी सोनं करावं.  खडतर प्रवासाशिवाय जगण्याला समृद्धी नाही. समाज रडणाऱ्यांचा नव्हे तर लढणाऱ्यांचा सन्मान करत असतो. जगण्याची लढाई सुरू ठेवा. यशाची चिंता करू नका. ते आपोआप मिळते. संस्काराच्या पेरणीला घरापासून प्रारंभ करा असे भावनिक आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले. मान्यवरांच्या हस्ते किनो शिक्षा गौरव विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ना. भुसे, आ.दराडे तसेच पूरस्कारार्थी आनंद आनेमवाड, घनश्याम आहिरे, वाल्मिक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. रईस शेख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तीस पुरस्कारार्थीना गौरविण्यात आले. यावेळी राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बच्छाव यांनी केले तर मुख्याध्यापक रोहित चव्हाण यांनी आभार मानले.

 पुरस्कारप्राप्त शिक्षक
पालघर - आनंद आनेमवाड
मालेगाव - घनश्याम अहिरे, आरती महाजन, दीपाली काकळीज, भूषण कदम, नितिन शेलार, विशाल बोरसे
नाशिक - वाल्मिक चव्हाण, शेख शगिर हुसेन
चांदवड - सविता भामरे
सिन्नर - संध्या परदेशी
देवळा-  अबरार मण्यार
बागलाण - शंकर राजपूत
कळवण - जावेद नबीलाल कारभारी
पेठ -  सचिन इंगळे
दिंडोरी - एम. नौशाद अब्बास
त्र्यंबकेश्वर - केशव गावित
नांदगाव - संदीप वेताळ
इगतपुरी - विजय पगारे 
निफाड - गोरखनाथ सानप
येवला - सचिन लांडगे
धुळे - योगेंद्रसिंग पाटील, 
गडचिरोली - विनीत पद्ममावर
पुणे - संतोष डुकरे
मुंबई - छाया घाटगे
औरंगाबाद - राजाभाऊ वायाळ
परभणी - निरस नारायनराव
नगर - तुकाराम अडसूळ
 जिल्हास्तरीय शाळेचा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा मालूजे ता.इगतपुरी जि.नाशिक व राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता. आष्टी जि. बीड


ताज्या बातम्या