Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव बाहासाठी ३०८ मुख्य व नऊ सहाय्यकारी मतदान केंद्र..

दि . 16/09/2019

मालेगाव: निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केले आहे. यातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात तीनलाख ३९ हजार ७१, तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ दोन लाख ९१ हजार ६०३ मतदार आहेत. नवमतदारांच्या नोंदणीमुळे दोन्ही मतदारसंघ मतदार संख्या वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हा जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे येथील निवडणूक शाखेत निवडणुकीची तयारी सुरू आहे.मालेगाव बाहासाठी ३०८ मुख्य व नऊ सहाय्यकारी मतदान केंद्र असतील. मालेगाव मध्य मतदारसंघासाठी २८० मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.छायाचित्रासह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मध्यच्या ९६.९७ टक्के,तर बाह्यच्या ९६.४५ टक्के मतदारांची छायाचित्रे अपलोड आहेत. अपवादात्मक मतदारांची नावे विनाछायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत. मालेगाव बाह्य एकूण प्रौढ लोकसंख्या चार लाख ७९ हजार ९८ इतकी आहे. पैकी ७०.७७ टक्के मतदार आहेत, तर मालेगाव मध्य प्रौढ लोकसंख्या कौन लाख ९४ हजार २७ असून, यातील ७४ टक्के नागरिक असल्याचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले. 


ताज्या बातम्या