Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३३ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दि . 16/09/2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३३ पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी रूजू करून घ्यावे अशा सूचना जिल्हा पाेलिसप्रमुख डाॅ. आरतीसिंह यांनी दिल्या आहेत.केंद्रीय निवडणूक आयाेगाने मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील आस्थापनेवरील नि:शस्त्र पाेलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे निर्देश दिले हाेते. या निर्देशाप्रमाणे ऑगस्ट  महिन्यात जिल्हास्तरीय आस्थापना मंडळाची बैठक झाली हाेती. बैठकीत ११ सहाय्यक पाेलिस निरीक्षक व २२ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
अधिकाऱ्यांची नावे व बदलीचे ठिकाण
सहाय्यक पाेलिस निरीक्षक : आशिषकुमार आसराजी आडसुळ (सायखेडा पाेलिस ठाणे), महेश यशवंत मांडवे (नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण), शिवचरण काशिनाथ पांढरे (जायखेडा पाेलिस ठाणे), रामचंद्र तुकाराम कर्पे (त्र्यंबक पाेलिस ठाणे), खंडेराव तुळशीराम रंणवे (लासलगाव पाेलिस ठाणे), विलास लक्ष्मणराव ताटीकाेंडलवार (मालेगाव तालुका पाेलिस ठाणे), जालिंदर आदिक पळे (घाेटी पाेलिस ठाणे), विशाल जयसिंग टकले (येवला तालुका पाेलिस ठाणे), गणेश गुरव (चांदवड पाेलिस ठाणे), हेमंत अरुण कडूकार (रमजानपुरा पाेलिस ठाणे), राजू भागवत लाेखंडे (बाऱ्हे पाेलिस ठाणे).
पाेलिस उपनिरीक्षक : शांताराम हिरामण देशमुख (नक्षल सेल नाशिक ग्रामीण), डाेमदेव मुरलीधर गवारे (ओझर विमानतळ सुरक्षा, ओझर), सुनील माेरे (शहर वाहतूक शाखा, मालेगाव), सारंग सुरेश चव्हाण (बाॅम्ब शाेधक व नाशक पथक, मालेगाव), गाेरखनाथ दत्तात्रय पाटील (शहर वाहतूक शाखा, मालेगाव), निळकंठ भगवान साेनवणे (कळवण पाेलिस ठाणे) सुरेश बाबूलाल चाैधरी (पिंपळगाव बसवंत, पाेलिस ठाणे), नितीन नारायण पाटील ( मालेगाव कॅम्प पाेलिस ठाणे), मनाेहर काशिनाथ माळी (नियंत्रण कक्ष, नाशिक ग्रामीण), अतुल भुजंगराव क्षीरसागर (मनमाड शहर पाेलिस ठाणे), सागर अशाेक नांद्रे (सुरगाणा पाेलिस ठाणे), युवराज आश्रू चव्हाण (येवला शहर पाेलिस ठाणे), घनशाम चंद्रकांत तांबे (सायखेडा पाेलिस ठाणे), सचिन बाळू तांबे (दिंडाेरी पाेलिस ठाणे), सुभाष शिवाजी माने (आझादनगर पाेलिस ठाणे, मालेगाव), कल्पेशकुमार विजय चव्हाण (दिंडाेरी पाेलिस ठाणे), छाया भानुदास पाटील (दिंडाेरी पाेलिस ठाणे), गणेश हरिभाऊ जांभळे (नियंत्रण कक्ष, मालेगाव), रफिक अफजल पठाण (वाचक, नाशिक ग्रामीण उपविभाग), शिवाजी बापू नागवे (हरसूल पाेलिस ठाणे), रामकृष्ण शांताराम साेनवणे (लासलगाव पाेलिस ठाणे), याेगेश शिवाजी शिंदे (वणी पाेलिस ठाणे).
 


ताज्या बातम्या