Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सावधान, डेंग्यू आलाय ! शहरात डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ,नागरिकांत भीती; साथीच्या आजाराचा धोका ओळखून प्रशासन उपाययोजना करेल का ?

दि . 15/09/2019

सावधान, डेंग्यू आलाय ! शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती;साथीच्या आजाराचा संभाव्य धोका ओळखून प्रशासन उपाययोजना करेल का ?शहरातील सामान्य रुग्णालयासह सर्व खाजगी रुग्णालये हाउस फुल्ल. 

मालेगाव शहरात गेल्या आठवड्याभरात दोन ते तीन दिवस सतत भिज पाऊस झाल्यानंतर साथीच्या आजाराने शहरात थैमान घातले आहे. बदलत्या वातावरणामुळे शहरातील सामान्य रुग्णालयासह सर्व खाजगी रुग्णालये हाउस फुल्ल आहेत.शहरात डेंगी सदृश रुग्णांची लक्षणीय वाढ होत असल्याने मालेगावकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मागील वर्षी याच दिवसांमध्ये शहरामध्ये डेंग्यूची साथ आली होती. यात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळा सुरू झाल्यापासून साथीच्या आजाराचा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाला यंदाही कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने पुन्हा शहरात साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील बहुतेक खाजगी रुग्णालयात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तात्काळ नाशिक येथे हलविण्यात आले आहे.मालेगाव स,सामान्य रुग्णालयात १९ पेक्षा जास्त रुग्नांचे रिपोर्ट डेंग्यू असल्याचे स्पष्ठ झाले आहे. पावसामुळे  वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. बदलत्या वातावरणांत तक्रारी वाढल्या. यात अनेकांना पोटदुखी व जुलाब अशा लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे साथीच्या आजारांसह डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. येथील सामान्य रुग्णालयात देखील अनेक रुग्ण तापाने फणफणले आहेत. शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील मालेगाव कॅम्प, सोयगाव, उद्याने, तसेच पूर्व भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील रहिवाशांना ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने यावर उपपयोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 
------------उपाययोजना कधी?
मनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी कधी सुरू करण्यात येईल.असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी व धुरळणी केला  जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे. मात्र याबाबत लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन याबाबत कधी उपाययोजना करणार  असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याने डासांची प्रमाण वाढून साथीच्या आजारांचा प्रसार झाला  आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
--------------


ताज्या बातम्या