Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुंगसे,टेहरे च्या शेतकऱ्यांचे पाटबंधारे कार्यालयात रात्री ठिय्या; संबंधित विभागात कोणताही अधीकारी मुख्यालयी नसल्याने प्रशासनाची तारांबळ...

दि . 14/09/2019

मालेगाव तालुक्यात येणाऱ्या पूर पाण्याबाबत वेळोवळी मागण्या करूनही अद्याप पर्यंत पूर्ण पाणी पोहोचले नसल्याने तालुक्यातील मुंगसे, पाटणे आणि टेहरे या गावांमधील शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे उपविभाग मालेगाव यांच्या कार्यालयासमोर मध्यरात्रीपर्यंत आंदोलन केले.यावेळी गेल्या दोन महिन्यापासून धरणक्षेत्रात भरपुर पाऊस होत असूनही  सुरू असलेले पूर पाणी अजून देखील अधिकाऱ्यांच्या व संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे मालेगाव तालुक्यात पाणी पोहचवू शकले नाहीत.पाणी वाटपात भेदभाव करीत असल्याचा आरोप आणि उडवा उडवीचे व समाधान कारक उत्तर न मिळल्याने  शेतकरी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. ज्या ठिकाणी म्हणजेच मुंगसे,कौळाने व त्यापुढील गावांना अद्यापही पाणी पोहोचू शकले नसल्याने  शेतकऱ्यांनी आज मालेगाव पाटबंधारे विभाग या कार्यालयाच्या समोर आंदोलन केले.परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थित आंदोलन सुरू केले.यावेळी सायंकाळी पाच वाजेपासून आत्तापर्यंत आंदोलन सुरू होते. आंदोलन सुरू असल्याचे बघून पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत उद्या सायंकाळपर्यंत पाणी संबंधित गावांना पोहोचेल या आश्‍वासनानंतर शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. 
उशिरापर्यंत चालणारे आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची तरंबळ उडाली.परंतु यावेळेस संबंधित विभागाचे कोणतेही अधिकारी या मुख्यालयी उपलब्ध नसल्याने पोलीस प्रशासनाची बराच वेळ तारांबळ उडाली होती.अखेर फोनवरच आंदोलकांना आश्वस्त संबंधित विभागाने केल्यानंतर शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत तरी आंदोलन स्थगित केलं.यावेळी सरपंच मुंगसे रविदादा सुर्यवंशी 
विजय सुर्यवंशी  गंगासाहेब सुर्यवंशी  सतिश सुर्यवंशी आप्पा सुर्यवंशी उत्तम सुर्यवंशी. दिनेश सागर. वाल्मीक सुर्यवंशी. सुजीत सुर्यवंशी. भगवान सुर्यवंशी शेखर सुर्यवंशी. प्रभाकर पाटील. दिनेश सुर्यवंशी. प्रदीप सुर्यवंशी. बाबुलाल सुर्यवंशी,भारत सुर्यवंशी,प्रभाकर शेवाळे. 
अरूण माऊली टेहरे,समाधान सुर्यवंशी. निवृत्ती सुर्यवंशी गजमल सुर्यवंशी अदी शेतकरी उपस्थित होते.


ताज्या बातम्या