Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
व्यायाम योगा करीत एकता गणपती मंडळाचा बाप्पाला निरोप; मालेगावात पहिलावहिला प्रयोग..

दि . 12/09/2019

अनेक वर्षांची परंपरा लाभलेले मालेगाव शहरातील नावाजलेला गणपती मंडळ म्हणजे,मालेगाव शहरातील सटाणा रोड वरील एकता गणपती मंडळ या मंडळाने यावर्षी अनोखा उपक्रम राबवून गणपती विसर्जनाचा कार्यक्रम केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. व्यायामाबरोबरच योग साधना,शरीराच्या व्यायाम करीत  एका म्युझिक सिस्टीम च्या तालावर व्यायाम करत एक ताल धरत वृद्ध, तरुण एकाच तालावर व्यायाम करत आनंदात बाप्पाला निरोप दिला.
असा उपक्रम राबवणारे बहुतेक जिल्ह्यात हे पहिलंवहिलं गणपती मंडळ असेल त्यामध्ये इको-फ्रेंडली सह व्यायामाच्या प्रकारांची माहिती तालासुरात व्यायाम सर्वांच्या स्वास्थ्यासाठी कसे महत्त्वाचे आहे ह्या गोष्टी समजून दिल्या जात होत्या. यावेळी या मंडळाचे अध्यक्ष तसेच भाजपाचे जेष्ठ नेते सुनील आबा गायकवाड, मदन गायकवाड यांच्यासह एकता गणेश मंडळाचे सर्व सदस्य ही सहभागी झाले होते.


ताज्या बातम्या