Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सटाणा नाक्यावर अपर पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत विशेष पथकाची जुगार अड्यावर कार्यवाही; साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह १९अटकेत १० फरार..

दि . 09/09/2019

मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी,बंद घरामध्ये जुगार खेळत असल्याच्या संशयावरून अपर पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांच्यासह त्यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाकडून रात्री दिड वाजेच्या दरम्यान  बंद घरामध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळताना १९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर १०आरोपी फरार झाले आहेत.शहराच्या मध्यवर्ती नामवंत लोकांच्या परिसरात या प्रकारच्या धंदे चालत असतांना गेल्या सहा महिन्यात दुसरी कारवाही स्वतः पोलिस अधीक्षकांसह त्यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला कारवाही करावी लागते याचे स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नेमके शहरातील अवैध धंदे नेमके कुणाच्या वरदहस्तने चालू आहेत असा शहरातील नागरिकांना आहे.यात 
१) प्रसाद लास मोरे
२) शेख शहिद शेख बशीर 
३) मिल मनोहर महसदे
४) संतोष बाळ मंडाळे
५) शख सलीम शेख 
६) अब्दुल रशिद 
७) शेख शरीफ शेख
८) मोहमंद वाजीद मोहमद अनीस
९) मोहमंद दयान मोहमंद 
१0) सैय्यद सलील सैय्यद हमीद
११) शेख सिकंदर शेख
१२) अफरोज शख रमजान
१३) शेख मुख्तार शेख 
१४)नदीम अर्थ सईद अख्तर
१५)पांडुरंग बाळ शिरसाठ, 
१६) सय्यद सईद सैयद गुलाम रसूल, 
१७) हरफान खान इलीयास खान
१८) राहुल दिलीप पवार,
१९) मद शिवाजी आहीर 
यांना अटक करण्यात आली असून १० आरोपी फरार त्यांच्याकडून २,२१,४२० रुपये रोख यासह मुद्देमालात एकूण ५,७१,४२० रुपयांचे साहित्य,साधने व रोख रक्कम छावणी पोलिसांनी जप्त केले आहे.तसेच याबाबतीत तसा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेला आला आहे.याच परिसरात सलग दुसऱ्यांदा मोठी कारवाही झाल्याने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुघे ,विशेष पथकाचे प्रमुख कल्पेशकुमार चव्हाण  यांच्यासह अभिजीत साबळे,दिनेश शेरावतें, आर.सी.पी.कर्मचारी व छावणी पोलिस निरीक्षक वाढिले यांच्यासह पोलिसांनी काम पाहिले.


ताज्या बातम्या