Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
६ मोटार सायकली जप्त; छावणी पोलिसांची कार्यवाही..

दि . 08/09/2019

छावणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील खडकी येथील आरोपी नकुल दीपक पवार याच्याकडून ०६ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा मजेसाठी हौशी मोटारसायकल चोर असून,अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायकली निघण्याची शक्यता आहे.

छावणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील खडकी येथील आरोपी नकुल दीपक पवार याच्याकडून ०६ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा आपल्या हौस आणि मजा करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरी करीत असून चोरलेल्या मोटारसायकलीचे ज्या ठिकाणी पेट्रोल संपले त्याच ठिकाणी मोटारसायकल सोडून  देत असून, अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायकली निघण्याची शक्यता आहे.
जप्त केलेल्या ०६ गुन्ह्यातील मोटारसायकली ह्या मालेगाव शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत. पोलिसांना गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदिप घुघे, कॅम्प उप विभागाचे अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वाढिले यांनी सदर गुन्ह्याच्या तपासबाबत  यांच्या पथकाने गस्त घालत असतांना आरोपीसह मोटारसायकली ताब्यात घेतल्या.यात पोलीस नाईक अविनाश राठोड,महेश गवळी,शांतीलल जगताप,पंकज भोये,नितीन बाराहोते,संदीप राठोड,संजय पाटील,नरेंद्र कोळी,सचिन गांगुर्डे यांनी काम पाहिले.


ताज्या बातम्या