Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नाशिकचे चार पोलिस लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात..

दि . 08/09/2019

आरोपीला अटक करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे गेलेल्या आडगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. आरोपीला आणखी कोणत्याही गुन्ह्यात न अडकवण्यासाठी आरोपी पोलिसांनी लाच मागितली होती. त्यावेळी लाच लुचपत विभागाने या चारही पोलिसांना अटक केली.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या भावाविरुद्ध नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मदत करण्यासाठी आणि इतर गुन्ह्यात न अडकवण्यासाठी आरोपी पोलिसांनी तक्रारदार महिलेकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर महिलेने चार हजार रुपये दे्ण्याची संमती दर्शवली. त्यानंतर आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या समंतीने लाचेची रक्कम ठरवण्यात आली. या चारही आरोपी पोलिसांनी एकमेकांच्या संमतीने आणि प्रोत्साहनाने लाचेची मागणी करत लाच स्विकारली असल्याचे लाच लुचपत विभागाने म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस नाईक अनिल केदारे, मिथुन गायकवाड आणि पोलीस शिपाई प्रदीप जोंधळे यांना अटक करण्यात आली.


ताज्या बातम्या