Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावातल्या लाकडी पुलावर लुटीच्या उद्देशाने धारधार शस्त्राने वार; मालेगावकरांची सुरक्षा गणरायाच्या भरवशावर...

दि . 06/09/2019

मालेगावात मोसम पुलाला लागूनच असलेल्या आहिल्याबाई होळकर या लाकडी पुलावर एकावर धार धार हत्याराने गळ्यावर वार..

रस्त्याने चालताना सावधान! तुमच्यावर ही होऊ शकतो हल्ला...

-३० ते ४० टाके पडतील एवढी मोठी जखम असून मोठी असून प्रकृती गंभीर..

-शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील घटना..
-शहरात पोलसीसंचा धाक नसल्याचे उघड.

-यात चोरीचा उद्देश असल्याने पायी चालत असतांना मोबाईल हिसकावून घेत असतांना प्रतिकार करत असतांनाच चोरट्यांनी केला वार.

-रातीलाल वाघ असे जखमी नाव असून गंभीर जखमी आहे.

-सदर इसम MSEB चा कर्मचारी असल्याची माहिती.

-रात्री साडेनऊ च्या सुमारास तो तेथून जात असताना त्याचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिकार केला,त्यामुळे चोरट्यांनी त्याच्या गळ्यावर वार केला.

-गळ्यावर वार केल्याने सदर व्यक्ती गंभीर जखमी असून त्यास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

-रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी चोरट्यांनी धार धार हत्याराने वार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

-यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

-ऐन गणपतीच्या काळात महिला पुरुष कुटुंबासह एकत्र गणपती बघण्यास जात असता आणि अश्या घटनेनंतर भीती निर्माण झाली आहे.

-पोलीसांकडून फरार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.


ताज्या बातम्या