Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे खड्डेपूजन आंदोलन; मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी...

दि . 04/09/2019

मालेगाव मनपा च्या निषेधार्थ मालेगाव मध्यवर्ती गणेशोत्सव समिती रस्त्यावर...

खड्या ची पूजा आणि मनपाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन..

मनपा आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..
जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे समितीचे म्हणणे..

-रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे तुमचा आमचा रोजचा प्रवास जीवघेणा झाला आहे.पालिका प्रशासन असो कि राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हे खड्डे भरण्याच्या बाबतीत गंभीर नसल्याने वारंवार दिसून येते. चक्क रस्त्यावरील खड्यासाठी वैतागून मालेगाव च्या सत्ताधारी च्या विरोधात मालेगाव मध्यवर्ती गणेश उत्सव समिती चे आंदोलनकरीत यास जबाबदार म्हणून मनपा आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली आहे.
 मालेगाव शहरातील सटाणा रोड, कॅम्प रोड सह शरतील प्रमुख रस्ते हे खड्या मुळे चक्क जिल्हाधिकारी यांच्या अस्वसानंतर ही अद्याप खड्याच्या बाबतीत काहीही कारवाई करण्यात आली. शहरातील नवीन बस स्थानकाजवळील उड्डाण पुलाच्या प्रवेशावरील रस्त्यावर पडलेले खड्डे चक्क जीवघेणी झाली आहे. यावेळी खड्यांचे पूजाही करण्यात आली.मालेगाव  मधील गणेशोत्सव समितीने हे अनोखे आंदोलन करून मालेगाव महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरले आहे .गणेशोत्सव सुरू असतांना शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.गणपती सणापूर्वी हे खड्डे भरणे अपेक्षित असतांना तसे होत नसल्याने या खड्यांचा त्रास बाप्पाच्या विसर्जनाला होणार आहे.त्यामुळे मग आता हे खड्डे न  भरल्याने आता तरी सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा करूया.


ताज्या बातम्या