Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
किनो शिक्षा गौरव पुरस्कार जाहीर

दि . 04/09/2019

मालेगाव - मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य तसेच जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे किनो शिक्षा गौरव पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत. यात राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद शाळा मल्याण ता. डहाणू जि.पालघर येथील शिक्षक आनंदा बालाजी आनेमवाड यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे सचिव रईस शेख यांनी दिली .

या राज्यस्तरीय पुरस्कारासह जिल्ह्यातील २५ शिक्षकांना जिल्ह्यास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.तसेच शिक्षकांसह राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दोन शाळांना पुरस्कार जाहीर झालेत. यात जिल्हास्तरीय शाळेचा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा मालूजे ता.इगतपुरी जि.नाशिक व राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता. आष्टी जि. बीड यांना जाहीर झाला आहे. 

या पुरस्कारसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते .सुमारे २०० शिक्षकांनी आपले प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पाठवले.याचे संस्थेच्या समितीद्वारे परीक्षण करण्यात येऊन पुरस्कार विजेत्या शिक्षक व शाळांची निवड करण्यात आली. येत्या १५ सप्टेंबरला या पुरस्कारांचा वितरण सोहळा मालेगावी माळी समाज मंगल कार्यालयात संपन्न होणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक

मालेगाव - घनश्याम अहिरे, आरती महाजन, दीपाली काकळीज, भूषण कदम, नितिन शेलार, विशाल बोरसे
नाशिक - वाल्मिक चव्हाण, शेख शगिर हुसेन
चांदवड - सविता भामरे
सिन्नर - संध्या परदेशी
देवळा-  अबरार मण्यार
बागलाण - शंकर राजपूत
कळवण - जावेद नबीलाल कारभारी
पेठ -  सचिन इंगळे
दिंडोरी - एम. नौशाद अब्बास
त्र्यंबकेश्वर - केशव गावित
नांदगाव - संदीप वेताळ
इगतपुरी - विजय पगारे 
निफाड - गोरखनाथ सानप
येवला - सचिन लांडगे


ताज्या बातम्या