Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
घरकुल घोटाळ्या प्रकरणात सुरेश जैन यांना 7 वर्षांची शिक्षा; 100 कोटींचा दंड

दि . 31/08/2019

माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आरोपींना धुळे न्यायालयाने घरकुल घोटाळाप्रकरणी दोषी ठरवत ठोठावली शिक्षा

 कोर्टाने जैन यांना 7 वर्ष शिक्षा व 100 कोटींचा दंड तर राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा ठोठावला दंड

 माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता

काय आहे प्रकरण :
▪ झोपडपट्टी निर्मूलनासाठी स्वस्तात घरे बांधून देण्याची योजना तत्कालीन नगरपालिका सत्ताधारी पक्षाने आखली
▪ यासाठी हुडकोकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आले
▪ मात्र योजनेअंतर्गत जिथे घरे बांधले ती जागा पालिकेची नसल्याचे नंतर उघड झाले
▪ यामध्ये बिल्डरांना 29 कोटी रुपये बिनव्याजी देण्यात आले
▪ कामातील अनियमिततेमुळे व विलंबामुळे पालिका कर्जबाजारी झाली हि बाब पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी 29 कोटी 59 लाख 9 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती

काय झाला न्यायालयीन युक्तिवाद :आरोपींच्या वकिलांनी आरोपी वयोवृद्ध असून त्यांचा घरकुल घोटाळ्याशी कुठलाही संबंध नाही तसेच आरोपी सराईत गुन्हेगार नसून अनावधानाने झालेल्या चुकीला माफ केले जावे असा युक्तिवाद केला. तर सरकारी वकिलांनी आरोपी नगरसेवकांनी व इतरांनी संगनमताने हा गुन्हा केला असून यामुळे लोकांच्या पैश्यांचा अपव्यय झाल्याचा युक्तिवाद केला.

कुणाला किती शिक्षा :
▪ सुरेश जैन : 7 वर्ष शिक्षा, 100 कोटी दंड
▪ गुलाबराव देवकर : 5 वर्ष शिक्षा, 5 लाख दंड, 
▪ बिल्डर जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयुर : 7 वर्ष शिक्षा, 40 कोटी दंड
▪ प्रदीप रायसोनी : 5 वर्ष शिक्षा 10 लाख दंड 

दरम्यान या खटल्यातील एकूण 52 आरोपींपैकी 3 आरोपी मृत असून 1 आरोपी फरार आहे. आज सुनावणीदरम्यान उर्वरित सर्व आरोपी उपस्थित होते.

 


ताज्या बातम्या