Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
छगन भुजबळांचा शिवसेना प्रवेश अखेर निश्चित, मातोश्रीवर बांधणार शिवबंधन..

दि . 31/08/2019

31 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ हे उद्या (1 सप्टेंबर)दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत

नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात कार्यकर्त्यांचं मोठं संघटन असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र भुजबळ यांच्याकडून वारंवार या चर्चा फेटाळल्या जात होत्या. मात्र आता भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ हे शिवसेना प्रवेशावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पोहोचणार आहेत.


ताज्या बातम्या