Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
 धुळ्यात केमिकल कंपनीत स्फोट; सात जणांचा मृत्यू..

दि . 31/08/2019

धुळ्यात एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी घडली.

या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी काही लोक अडकल्याची भितीही वर्तवण्यात येत आहे.

बचावकार्य सुरु: 
▪ घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. 
▪ अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 
▪ या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : या स्फोटामुळे आसपासचा परिसरही हादरला असून नागरिकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे. 

अद्यापही आग धुमसत असून परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. दरम्यान, हा स्फोट कशामुळे लागला याची माहिती अद्याप समोर आली नाही. 


ताज्या बातम्या