Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
माजी आमदारासह कार्यकर्त्यांचा उद्या MIM मध्ये जाहीर प्रवेश; विधानसभेला मालेगाव मध्यत आजी-माजी विरोधात असणार असल्याचे स्पष्ट..

दि . 28/08/2019

मालेगाव । मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील
प्रबळ दावेदार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमदइस्माईल यांनी अखेर एम आय एम ची वाट धरली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार आसिफ
शेख व एमआयएम वंचित बहुजन आघाडी माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत उद्या गुरुवारी येथील खैबान निशाद चौकात जाहीर सभेत मौलाना मुफ्ती समर्थक, वीसपेक्षा अधिक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एम आय एम मध्ये प्रवेश करतील.प्रवेशाबरोबरच मध्य विधान सभेतून एमआयएमतर्फे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
हज यात्रेला जाण्यापुर्वी मौलाना मुफ्ती यांनी तीन तलाक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रसने बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप
करीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. एमआयएमचे मा
लेगाव महानगराध्यक्ष मलिक युनूस ईसा, त्यांचे बंधू स्थायी
समितीचे सभापती डॉ. खालीद परवेज यांनी एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांना याबद्दल माहिती
दिली. मौलाना मुफ्तींच्या प्रवेशाला त्यांनीही संमती दुजोरा दिला. खैबान निशाद चौकात गुरुवारी होणाऱ्या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन एमआयएमने केले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार आसिफ
शेख व एमआयएम वंचित बहुजन आघाडी माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे.


ताज्या बातम्या