Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वाळूच्या अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅकरवर विशेष पोलीसपथकाची कार्यवाही...

दि . 28/08/2019

श्री संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक, मालेगाव यांच्या विशेष पथकातील पोउपनिरी कल्पेशकुमार चव्हाण,पोशि अभिजीत साबळे,पोशि दिनेश शेरावते,पोशि मिलिंद पवार अशांनीआज दुपारी सुमारास केलेल्या छापा कारवाईत मालेगाव किल्ला पोलीस ठाणे हद्दीत चंदनपुरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातून खंडेराव मंदीराच्या पाठीमागे 
१) बापु देविदास माळी रा-एकलव्य नगर चंदनपुरी ता. मालेगाव(चालक) 
२) सुरेश भिमराव रा-चंदनपुरी ता.मालेगाव (चालक व मालक) 
३)शरद वाघ रा-चंदनपुरी ता.मालेगाव(मालक फरार)

 असे स्वताचे ताब्यात असलेल्या दोन्ही ट्रक्टरमध्ये चंदनपुरी गावाजवळअसलेल्या गिरना नदीतुन वाळु उपसा करून बेकायदेशीरपणे,अवैधरित्या शासनाचा वाळु ह्या गौणखनीजाचा कुठलाही परवाना नसतांना,वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चोरून वाहतुक करतांना एकुन 2 ब्रास वाळु  ट्रक्टरसहीत एकुन मुद्देमाल 4,56,000 रू.च्या मुद्देमालासह मिळुन आले आहेत.तरी सदर दोन्ही ईसम व मुद्देमाल ताब्यात घेवुन मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या