Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्रदुषणाबाबत मते जाणून घेण्यासाठी आलेल्या हरित लवादाच्या समितीसमोर प्लास्टिक गिट्टी व सायाजिंग कारखानदारांचा राडा..

दि . 23/08/2019

  • सुनावणीदरम्यान गोंधळ निर्माण झाल्यावर महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे एवढ्या महत्वाच्या सुनावणीच्या आयोजनाबाबत स्थानिक पालिका, महसुल व पोलीस अनभिज्ञ कसे? असा प्रश्न नागरिकांनी केला. तसेच नागरिकांना  निर्भय वातावरणात तक्रार करता येऊ नये यासाठीच प्रदूषणकर्त्यांनी गर्दी करून दबाव आणल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


मालेगाव शहरातील प्लास्टिक गिट्टी व सायाजिंग कारखान्यामुळे होणा-या प्रदुषणाबाबत मालेगाव शहरातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका यांच्या संयुक्त समितीसमोर जनसुनावणी आयोजन करण्यात आली होते. मात्र या जनसुनावणीत प्लास्टिक गिट्टी व सायनिंग कारखानदार यांनी घातलेला गोंधळ व दबावामुळे सुनावणी फिसकटल्याचे पाहायला मिळाले. केवळ औपचारिकता म्हणून अखेर समितीने गोंधळातच कामकाज पूर्ण करीत सुनावणी गुंडाळली. शहरातील  प्रदूषणामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असल्याने या गंभीर विषयावर सुनावणी घेतांना समिती, पालिका,महसूल व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव यावेळी दिसून आला.ग्रीन ड्राईव्ह या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते कलीम अब्दुला यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेची लवादाने गंभीर दखल घेत लवादाने कारवाईचे आदेश दिल्याने प्रदूषणकर्त्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहे.

सुनावणीस्थळी आलेल्या याचिकाकर्ते कलीम यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी काही लोक त्यांच्यावर धावून गेल्याने त्यांना धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. अखेर त्यांनी येथून काढता पाय घेतला.या गोंधळामुळे तक्रारीसाठी आलेल्या अनेक नागरिकांना तक्रार न मांडतातच परतावे लागले काहींनी आपल्या लेखी तक्रारी समितीकडे सुपूर्त केल्यात. तणाव वाढू लागल्यानंतर मात्र सुनावणीस्थळी थेट दंग नियंत्रण पथक, राज्य राखीव व स्थानिक पोलीस दलाच्या जवानांना पाचारण करण्याची वेळ आली.
संपूर्ण सुनावणीदरम्यान प्लास्टिक व सायाजिंग कारखानदार सभागृहात ठाण मांडून असल्याने वारंवार सुनावणीदरम्यान अधिका-यांवर दबाव टाकण्याचा गोंधळ घालण्याचा प्रकार झाला. सुनावणी दबावात होत असल्याची बाब पत्रकारांनी मांडल्यानंतर  अधिका-यांनी काढता पाय घेतला.


ताज्या बातम्या