Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आपुलकी संस्थेतर्फे पूरग्रस्तांना पाच हजाराची मदत

दि . 22/08/2019

मालेगाव : येथील आपुलकी शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादाजी काकळीज होते. यावेळी संस्थेच्या वतीने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना ५ हजार रुपयांचे रक्कम देण्याचे ठरवले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल जगताप यांची शिक्षक सेनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याने व संस्थेचे सभासद सुनील खैरनार यांना रोटरी क्लब चा आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे नविन सभासद जयवंत अहिरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष काकळीज, कोषाध्यक्ष अनिल जगताप,जेष्ठ सभासद रमेश बच्छाव, कैलास दाभाडे, सुरेश पवार, कैलास बच्छाव, योगेश गोसावी, श्रीकांत कापडणीस, दिपक अहिरे, उज्वल हिरे, गणेश हिरे, साहेबराव हिरे, निलेश हिरे, जयवंत आहिरे, हरिभाऊ जगताप, दादाजी अहिरे, मोठाभाऊ हिरे, सुनील खैरनार,धर्मेंद्र पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. सुत्रसंचलन सुनील आहेर यांनी केले तर आभार सुरेश पवार यांंनी मानले.


ताज्या बातम्या