Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
श्रीक्षेत्र रोकडोबा येथे यात्रोत्सव भाविकांची गर्दी ; पर्यटनालाही पसंती

दि . 22/08/2019

मालेेगाव - दाभाडी शिवारातील श्रीक्षेत्र रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात श्रावण महिन्यातील यात्रोत्सवाला सुरुवात झाली. श्रावण शनिवारी भाविकांनी रोकडोबा हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 
श्रावण महिन्यात भरणाऱ्या या यात्रेत खेळण्यांची, खाद्यपदार्थ, नारळ, पूजेचे साहित्यांची दुकाने लागली आहेत. तसेच मोठी पाळणे, ब्रेक डान्स, देखील आली आहेत. संपूर्ण श्रावण महिना येथे यात्रा सुरू असते. शहरालगत असल्यामुळे येथे भाविक मोठया संख्येने गर्दी करतात. या मंदिराशेजारी गिरणा नदी वाहते त्यामुळे भाविक सुट्टीच्या दिवशी तसेच सायंकाळी नदी किनारी पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. सायंकाळी अनेकजण आपल्या कुटुंबासह गिरणा नदी काठी निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. श्रीक्षेत्र रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातच शनी देवाचे मंदिर असल्याने या देवस्थानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसामुळे मंदिर परिसर हिरवाईने नटला आहे. त्यामुळे मालेगावसह परिसरातील अनेक भाविक आकर्षिले जात आहेत.


ताज्या बातम्या