Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाकिस्तान आणि काश्मीरबाबत अर्धा तास फोनवर चर्चा

दि . 19/08/2019

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आज टेलिफोनवर झालेल्या अर्धा तास चर्चेत द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्दे होते, अशी माहिती आहे. मोदींनी पाकिस्तान संदर्भात म्हटले की, काही स्थानिक नेत्यांचे भडकाऊ विधाने आणि भारताविरोधी हिंसेला चालना देणे हे देशासाठी योग्य नाही.

सीमेच्या पलिकडे दहशदवादाला थांबवणे आणि दहशदवाद आणि हिंसामुक्त वातावरण बनवणे गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी ट्रम्पसोबत अफगानिस्तान संदर्भातही चर्चा केली. ते म्हणाले की, भारत एकत्र, सुरक्षित आणि लोकशाही
असलेल्या अफगानिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे.

पंतप्रधानांनी यावर्षी जूनमध्ये जापानच्या आसाकामध्ये ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा विषय काढला. अशी आशा आहे की, दोन्ही देशांमध्ये वाणिज्य मंत्री लवकरच द्विपक्षीय व्यापाराबद्दल चर्चा करण्यासाठी भेटतील. व्हाइट हाउसमधून सांगण्यात आले आहे की, ट्रम्प यांनी इम्रान यांना सल्ला दिला होता की, जर पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर भारतासोबत असलेला तनाव कमी करू इच्छित असतील, तर द्विपक्षीय चर्चा करावी लागेल.


ताज्या बातम्या