Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव अपर पोलीस अधीक्षकांचा जुगाऱ्यांवर छापा; शिवसेनेच्या जिल्हापदाधिकाऱ्यासह आठ जनांवर गुन्हा दाखल..

दि . 19/08/2019

मालेगाव शहरातील कॅम्प परिसरातील सोमवार बाजारातील,पवार गल्लीमध्ये जुगार खेळत असल्याच्या संशयावरून अपर पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांच्यासह त्यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाकडून रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान संदीप पवार यांच्या बंद घरामध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळताना आठ आरोपींना  (      ....कायदेशीर बाबींचा विचार करून कायद्याला बांधील राहावे यामुळे नावे काढण्यात आलेत.....     )   ताब्यात घेण्यात आले

असून त्यांच्याकडून ५५,१०० रुपये रोख यासह मुद्देमालात एकूण १,८१,६०० रुपयांचे साहित्य,साधने व रोख रक्कम कॅम्प पोलिसांनी जप्त केली आहे.तसेच याबाबतीत तसा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात सेनेच्या जिल्हापदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुघे ,विशेष पथकाचे प्रमुख कल्पेशकुमार चव्हाण  यांच्यासह अभिजीत साबळे,दिनेश शेरावतें, आर.सी.पी.कर्मचारी व कँम्प पोलिसांनी काम पाहिले.


ताज्या बातम्या