Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात किदवाई रोड येथे बॉम्ब असल्याची अफवा...

दि . 17/08/2019

मालेगाव शहरातील किदवाई रोड वरील एका सुरत ला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने रात्री साडेअकरा च्या दरम्यान एकच खळबळ उडाली होती.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत किदवाईरोडला छावणीचे स्वरूप आले होते.

एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात सुरत जाणाऱ्या बस मध्ये बॉम्ब आहे त्या गाडीस लगेच थांबवा असा पाच वेळा एका निनावी नंबर वरून फोन आल्यानंतर संबंधित ट्रॅव्हल्स मालकाने त्वरित पोलिसांना संपर्क साधला.पोलिसांनी लगेचच त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण सामानाची आणि ट्रॅव्हल्स ची बॉम्ब शोधक पथकातर्फे तपासणी करण्यात आली.परंतू यात काहीच आढळून न आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करून काहीही आढळून आले नसले तरी त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करीत असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांनी सांगितले...


ताज्या बातम्या