Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पेंशन हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित बच्छाव....

दि . 15/08/2019

मालेगाव-महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची मालेगाव तालुक्याच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड पार पडली. त्यात तालुक्याच्या अध्यक्षपदी सुमित बच्छाव यांची तर सरचिटणीसपदी राजेंद्र खैरनार यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडप्रक्रियेस जिल्हा कार्यकारिणीतर्फे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश नहिरे व नितीन शिंदे उपस्थित होते. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेंशन योजना बंद केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. त्यामुळे जुनी पेंशन ह्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना अस्तित्वात आली. आणि गेल्या काही वर्षांत अतिशय आक्रमकपणे संघटना आपला प्रश्न शासन दरबारी मांडत आहे. मालेगाव तालुका शाखेची मुदत संपल्याने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्षपदासाठी, सरचिटणीस पदासाठी सुमित बच्छाव व राजेंद्र खैरनार यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. याचसोबत नवीन कार्यकारिणीत तालुका नेतेपदी किरण फुलपगारे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब कापडणीस, कोषाध्यक्षपदी शाम ठाकरे, संपर्कप्रमुखपदी अभिजीत देसले, तर प्रमुख उपाध्यक्ष पदी भूषण कदम व परेश बडगुजर तर प्रसिद्धिप्रमुखपदी भरत पाटील व विष्णू गुमाडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी निलेश नहिरे, नितीन शिंदे, सुमित बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सचिन शिंदे, अमोल जगताप, संदीप पठाडे, विशाल धिवरे, पंकज पाटील, आदेश जवणे, विरेंद्र खडसे, रवींद्र महाजन, किशोर रौंदळ, वैभव सोनवणे, ललित कापडणीस, विशाल मिसर,  राजेंद्र पाटील, मनोहर भामरे, किशोर देवरे, किरण जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


जुनी पेन्शनचा मागणीसाठी येत्या काळात राज्यभरात होणाऱ्या तीव्र लढ्यासाठी मालेगाव शाखा सक्रियरित्या सामील होईल. पेंशनच्या प्रश्नसोबतच स्थायित्व प्रमाणपत्र, डिसीपीएस योजनेचा हिशोब, चटोपाध्याय इ प्रश्नांसाठी संघटना आक्रमकरित्या लढा देईल.
-सुमित बच्छाव, अध्यक्ष


जुन्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठीत केली असून, येत्या काळात तालुकाभरातील सभासदांचे प्रश्न सर्व पदाधिकारी नक्कीच सोडवतील अशी शाश्वती आहे.
- निलेश नहिरे, जिल्हा संपर्कप्रमुख


ताज्या बातम्या