Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
उज्ज्वल प्राथमिक शाळेत वैदिक रक्षाबंधन

दि . 14/08/2019

मालेगाव : येथील कलेक्टर पट्टा भागातील उज्ज्वल प्राथमिक शाळेत सतप्रेरणा ग्रुपच्या वतीने वैदिक रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्याने मुलांनी त्यांना छोटे रोपटे व आई वडिलांचे महत्त्व सांगणारे पुस्तक भेट दिले. यावेळी सतप्रेरणा ग्रुपच्या रोहिणी देवरे यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेचे महत्व समजून सांगितले व वैदिक राक्षबांधनाची संकल्पना स्पष्ट केली. सुचेता अग्रवाल, पूजा शुक्ला यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तुळशीच्या रोपांना देखील राखी बांधण्यात आली. मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वाती पाटील, स्वाती आहिरे, अमोल ठोके, प्रवीण काकळीज, दिवेश बोरसे, पुनम पवार, निलेश पवार, शीतल बेडसे, प्रतिभा बागुल आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. योगेश बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.


ताज्या बातम्या