Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काश्मीरमध्ये यंदा १५ ऑगस्ट होणार वेगळ्या पद्धतीने साजरा

दि . 14/08/2019

जम्मू-काश्मीर नव्हे तर, देशाच्या इतिहासातच ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख वेगळी असणार आहे. त्यातही जम्मू-काश्मीरसाठी या तारखेचं मोल वेगळचं हा. या दिवशी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला. एका झटक्यात हा निर्णय झाला. केंद्राच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. भारतात सर्वत्र या निर्णयाचं स्वागत झालं. पण, काहींनी हा निर्णय लोकशाहीला अनुसरून नसल्याचं म्हटलंय. निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेणं महत्त्वाचं होतं, असा सूर अनेकांनी आळवला आहे. अर्थात जल्लोष करणाऱ्यांच्या तुलनेत विरोध करणाऱ्यांची संख्या अतिशय फुटकळ होती. स्वातंत्र्यानंतर काश्मीर भारताचा भाग असूनही नसल्यासारखा होता, असं अनेकाचं मत होतं. आता सरकारने निर्णय घेतलाय. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोण कोणते बदल होणार याची उत्सुकता आहे.


ताज्या बातम्या