Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
Jio Giga Fiber लाँच, किंमत आणि प्लॅन्स जाहीर, LED टीव्ही आणि सेट टॉप मिळणार फुकट!

दि . 12/08/2019

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज जिओ गीगा फायबर सेवा लाँच केली आहे. यावेळी त्यांनी यूजर्ससाठी बऱ्याच घोषणा केल्या आहेत. 

थोडं पण कामाचं

  • पाच सप्टेंबरपासून सुरु होणार जिओ गीगा फायबरची सेवा
  • जिओ गीगा फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ७०० रुपये
  • प्लॅननुसार जिओची गीगा फायबर १०० ते १००० mbps स्पीड मिळणार

मोबाइल जगतात क्रांती केल्यानंतर आता जिओने फायबर सेवा सुरु करण्याची सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी यूजर्ससाठी अनेक गोष्टींची घोषणा केली. मुकेश अंबानी यांनी मीटिंगदरम्यान, जिओ फायबरबाबत घोषणा करताना असं म्हटलं की, याची सुरवात ही ५ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. याची बेसिक किंमत ही ७०० रुपये असेल. या पॅकेजमध्ये यूजर्सला १०० mbps स्पीड मिळणार आहे. याशिवाय जिओ फॉर एव्हर प्लॅनसह ग्राहकांना मोफत एलईडी टीव्ही आणि ४ के सेट टॉप बॉक्स देण्याचीही घोषणा केली आहे. 

जिओ फायबर सेवा सुरु करण्याची घोषणा ही मागील वर्षीच करण्यात आली होती. पण कंपनीने याचा डेटा प्लॅन आणि रियल टाइम स्पीड याच्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. रिलायन्स जिओने आतापर्यंत तब्बल ३४ कोटी यूजर्सचा आकडा पार केला आहे. एवढ्या कमी वेळात मिळालेल्या यशामुळे रिलायन्सला जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे.  


ताज्या बातम्या