Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मोसम नदीपात्रातील अवैध बांधकामामुळेच गेले पुलावरून पाणी; मोसम ने केली स्वतःची स्वच्छता !

दि . 11/08/2019

'मोसम' ने केली स्वतःची स्वच्छता !
दरवर्षी मोसम नदी स्वच्छतेसाठी अनेक सामाजिक संस्था तसेच महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना दरवर्षी अपयश येत आहे.

कोणाचे तरी खिसे भरण्यासाठी संपूर्ण निसर्गाला वेठीला धरण्याचा हा प्रकार निर्लज्ज आणि भयानक. 

धरणांतून सोडलेले पाणी आणि नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शहरात घुसले.या पुराची तीव्रता १९६९ पेक्षा जास्त नव्हतीच नदीच्या पात्रात होत असलेल्या भरमसाट बेकायदा बांधकामांमुळे नदीचे पात्र लहान होते आणि त्यामुळे पाणी पात्राबाहेर येते. मालेगावामध्ये काही दिवसांपूर्वी असेच घडले. मालेगाव शहरात पुनद, हरणबारी, चणकापुर आणि केळझर  या धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली. मालेगाव महापालिकेने पूररेषेतील क्षेत्रात बांधकामांना परवानग्या दिल्या. नियम धाब्यावर बसवून नदी नाल्यांचा संकोच करून ही बांधकामे होतच राहिली. परिणामी पूररेषा नावाची काही गोष्ट शिल्लकच राहिली नाही. मालेगाव शहरातील मोसम आणि गिरणाच्या काठच्या अतिक्रमणाकडे मनपासह सर्वपक्षीय दुर्लक्ष झाले. आज त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. 


ताज्या बातम्या