Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
स्टेट बँक परिसरात सी.सी. टीव्ही कॅमेरा व पोलिस बनोबस्त लावण्यात यावा: भाजपा युवा मोर्चाची मागणी..

दि . 10/08/2019

मालेगाव : येथील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रभाग अधिकारी पारखे व पोलिस निरीक्षक छावणी यांना सी. सी. टीव्ही कॅमेरा व कायम स्वरूपी पोलिस बंदोबस्ताच्या मागनीचे निवेदन देण्यात आले.

स्टेट बँक व बाजुलाच सेंट्रल बँक तसेच यूरो किड्स इंग्लिश मीडियम स्कूल व त्याबरोबरच आजु बाजूला दोन मोठी हॉटेल्स व ट्रव्हल्स ऑफिसेस असल्या करणाने परिसरात अतिशय वर्दळ असते. गर्दीचा फायदा घेत ह्याच परिसरात पैशाची बॅग पळविने, तसेच महिलांच्या गळ्यातील सोन साखळी ओरबडून पळविने इत्यादि प्रकार ह्या ठिकाणी झाल्याचे निदर्शनात आले असता. या भागात दोन दोन बँक असल्या कारणाने व्यापारी व नागरिक पैशाचा भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात याठिकाणी वावरत असतात याचाच फायदा काही दबा धरून बसलेले लुटारु घेत असतात. 
यावर अंकुश बसावा याकरिता या परिसरात सी. सी. टीव्ही लावल्यास नागरिकांना जीव मुठित धरून चालावे लागणार नाही व अश्या प्रकारच्या घटनांना अंकुश लागेल. तसेच कायम स्वरूपी पोलिस बंदोबस्त दिल्यास कुठलीही अप्रिय घटना या ठिकाणी घडणार नाही त्यामुळे स्टेट बँक कॉर्नर या ठिकाणी सी. सी. टीव्ही कॅमेरा व कायम स्वरूपी पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा या आशायाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी देवा पाटील, आनिल पाटील, गणेश लोखंडे, अंकित पिंगळे मनोज पाटील, शरद पानपाटील, शाम गांगुर्डे, आनिल हीरे, राघव भदाणे, अरुण वडगे, रोशन गांगुर्डे, सुनील हीरे, चंदू देवरे, सोनाथ विसपुते, आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या.


ताज्या बातम्या