Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
कालच्या विश्रांती नंतर पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाण्यात वाढ...

दि . 09/08/2019

मालेगाव- कालच्या विश्रांती नंतर आज पावसाची शहर व परिसरात संततधार सुरुच होती. चणकापूर, पुनद, हरणबारी, केळझर धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने गिरणा व मोसम नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चणकापूर धरणातून ६५८१ क्युसेक्स, पुनद धरणातून ४३७८ क्युसेक्स, केळझर धरणातून २०१२ क्युसेक्स असे एकुण १२ हजार ९७१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत करण्यात आला आहे. हरणबारी धरणातून ४२८१ क्युसेक्स पाणी मोसम नदीत विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


ताज्या बातम्या