Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव शहरात ०३ गावठी कट्ट्यासह १४ जिवंत काडतुसे हस्तगत - ०२ गुन्हेगार जेरबंद - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दि . 07/08/2019

नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांसह अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर मा. पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सत्वर कारवाई सुरु आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मालेगाव शहरातील मोहनबाबा नगर परिसरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे ०२ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचे कब्जातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल व १४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. 

आरोपींची नावे 
१) मोहंमद अमीन समसदोहा अन्सारी, वय ३५, रा गुलशन नगर, यासिन मोहन बाबा नगर, मालेगाव 
२) जगदीश सजन  कासवे, वय ३०, रा मोची  कॉर्नर, आय टि आय समोर, मालेगाव 

           वरील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीर रित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांचे विरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       मा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह मॅडम, व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. के के पाटील, पोहवा सुहास छत्रे, वसंत  महाले,पोना राकेश उबाळे, पोकॉ फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांचे पथकाने आर्म ऍक्ट अन्वये कारवाई केली आहे. आगामी काळातही अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.


ताज्या बातम्या