Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना विशेष पोलीस पथकाने घेतले ताब्यात..

दि . 07/08/2019

मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थापण केलेल्या विशेष पोलीस पथकाने वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आज पहाटे अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना नामपुर  मालेगाव रोड वरील वडनेर खाकुर्डी येथे सापळा रचुन मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
मालेगाव अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नेमलेल्या कल्पेशकुमार चव्हाण यांच्या विशेष पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन तरुण दुचाकी वाहन क्र.KL-01 HL-3272 टीव्हीएस या  दुचाकीने लाल रंगाच्या बँग मध्ये अफु नावाचे अमली पदार्थ वाहतूक व  विक्रीसाठी मालेगाव शहराकडे येत असल्याचे समजताच मालेगाव ग्रामीण पोलिसांनी नामपूर -मालेगाव रोडवरील खाकुडी सावतावाडी  येथे अटक केलीय हे  दोन्ही ईसम मुळचे राजस्थान येथील राहनार असुन ते सध्या मालेगांव निळगव्हाण परिसरात राहत असल्याची माहिती कल्पेशकुमार चव्हाण यांनी दिली.
सुभाष  बिशणोई (वय 27)सोहनराम बशणोई (वय 22) आरोपींची नावे असून यांच्याकडून 7 किलो 952 ग्रॅम अफू अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी वडनेर खाकुडी पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या