Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




मनपाच्या स्थायीच्या सभापतीपदी AIMIM बिनविरोध; राजकीय विरोधक असलेल्या सेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसची छुपीसाथ..

दि . 07/08/2019

मालेगाव- येथील महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी एमएमआयचे डॉ खालीद परवेज शेख यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीमध्ये एमआयएमचे एकमेव सदस्य आहेत, मात्र सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना मैत्रीचा फायदा त्यांना मिळाला आहे.
स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या रिक्त जागेवर नवीन सभापती निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला  निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. डॉ खालीद परवेज यांचा एकमेव अर्ज असल्याने केवळ औपचारिक घोषणा करण्याचे शिल्लक होते.
महापालिकेच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत गे्ल्या दोन वर्षांत प्रथम काॅंग्रेस व दुसऱ्या वर्षी शिवसेनेला सभापतीपदासाठी संधी मिळाली होती. काॅंग्रेस व शिवसेना मैत्र सत्ताकाळातील या तडजोडी होत्या. मात्र दुसरीकडे काॅंग्रेस व एमआयएम यांच्यात देखील मैत्रीचे राजकारण आहे. त्यामुळे स्थायीच्या तिसऱ्या वर्षी एमआयएमला संधी देण्यात आली. मित्र पक्षाचा मित्र म्हणून शिवसेनेला एमआयएमसाठी मदतीचे राजकारण करावे लागले.

 

स्थायीतील पक्षीय बलाबल
काॅंग्रेस -                               ०६
जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधन आघाडी -        ०५
शिवसेना -.                         ०२
भारतीय जनता पार्टी-.         ०२
एम आय एम -.                   ०१
एकुण-.                             १६


ताज्या बातम्या